इंदापूर |
बारामती ऍग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या वर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु याधीच आमदार रोहित पवार या यांच्या बारामती ऍग्रो कारखान्यात (12 तारखेपासून) गळीत हंगाम सुरू केला, अशी तक्रार भाजपचे आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर साखर आयुक्तांनी याबाबत चौकशी समिती नेमली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
दरम्यान सुरुवातील चौकशी झाल्यानंतर आमदार पवार यांना क्लीनचिट देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर सहकार विभागाकडे आमदार शिंदे यांनी तक्रार दाखल केली. पुन्हा एकदा व्यवस्थापकीय संचालक गुळवे यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलिस करत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार पवार यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार शिंदे यांनी केली होती. शिंदे यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले होते. 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती.
0 Comments