बार्शी | शिराळे कारखाना स्फोट शासकीय मदत मंजूर..बार्शी |

बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे शिराळे फटाका कारखाना स्फोट प्रकरणातील मयत व्यक्तींच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे २५ लाख रूपये शासकीय मदत मंजूर केली आहे.

बार्शी तालुक्यातील शिराळे येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन या दुर्दैवी घटनेमध्ये ५ महीलांचा मृत्यू झाला होता.या मयतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी आमदार राजाभाऊ राऊत यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता,त्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मयत वारसांच्या कुटुंबास प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे २५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

    

Post a Comment

0 Comments