पैशाच्या बदल्यात कर्जदारास शरीरसुख द्यावे लागेल म्हणत विवाहितेचा छळ, करमाळा पोलिसात गुन्हा दाखल



करमाळा |

पैशाच्या बदल्यात कर्जदारास शरीरसुख द्यावे लागेल असे सांगितले. मात्र त्याला विरोध केला म्हणून २९ वर्षाच्या विवाहितेला पती व सासू यांनी अंगावरील सर्व कपडे काडून तिला मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणात पती, सासू, सासरे यांच्यासह सात संशियत आरोपींविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी विवाहित ही करमाळा शहरातील नामंकित भागातील आहे..

करमाळा पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार विवाहित फिर्यादीचा विवाह 2018 मध्ये करमाळ्यातील एका बड्या घरातील मुलाशी झाला होता. त्यानंतर फिर्यादी सासरी करमाळा येथे नांदण्यासाठी आली. त्यानंतर काही दिवसात ती प्रेग्नेंट राहिली. दरम्यान घरातील कामांवरून सासू, सासरे, दीर यांनी तिला त्रास देणे सुरु केले. ओटी भरण्याचा कार्यक्रम फिर्यादीच्या माहेरी झाला. तेव्हा तिचे सर्व दागिने सासरचं लोक घेऊन आले. 2019 मध्ये त्यांना मुलगा झाला.

प्रसूती झाल्यानंतर साधारण महिन्यात सासरचे फिर्यादीला माहेरवरून करमाळा येथे घेऊन आले. दरम्यान पुन्हा आठ दिवसांनी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींनी तिला मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. उपाशी पोटी ठेवून वडिलांकडून सात लाख रुपये घेऊन ये असे म्हणून त्रास सुरू केला. तेव्हा फिर्यादीच्या वडिलांनी सात लाख रुपये आणून दिले. लग्नामध्ये अंगावर घातलेले सोने घाण ठेवून त्यांनी प्लॉट घेतला.

नंतर नवरा सतत व्यसनाधीन राहून तिला वारंवार शिवेगाळ करून हाताने व लाथाबुक्कीने मारहाण करत होता. 2021 मध्ये फिर्यादी पुन्हा प्रेग्नेंट राहिली. साधारण दोन महिन्याची गरोदर असताना नवऱ्याने दारूच्या नशेत तिला हे बाळ ठेवायचे नाही व घरच्यांना देखील हे बाळ नको आहे, असे म्हणून भांडण करून तिला मारहाण केली. तिच्या पोटावर लाथा मारल्यामुळे बाळ पोटातच मरण पावले. त्यात तिला त्रास होऊन रक्तस्राव झाला. त्यानंतर करमाळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. संमतीशिवाय खाली केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

यापुढे फिर्यादीत म्हटले आहे की, काही दिवसांनी पतीच्या दुकानातील एका कामगारांने करमाळा येतील एकाकडून कर्ज काढून दिले होते. ते कर्ज फेडण्यासाठी पती व सासू कामगाराला रात्री- अपरात्री पाठवत होते. तो कामगार धमकी देत होता. ‘घरावर जप्ती आणली जाईल, घर खाली करावे लागेल, घर वाचवायचे असेल तर कर्जाचे पैसे द्यायचे नसतील तर मी म्हणेल ते ऐकावे लागेल’, असे म्हणत. व पती, सासू पैशाच्या बदल्यात कर्जदारास शरीर सुख द्यावे लागेल असे सांगत होते. मी त्याच्या या प्रकारास विरोध केला तेव्हा पती व सासू यांनी माझ्या अंगावरील सर्व कपडे काढले व रात्रभर काठीने मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तू जर माहेरी काही सांगितले तर तुझ्या एकुलत्या एक मुलाचा खून करीन, अशी धमकीही दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments