बार्शी बायपास रोडवरील धस पिंपळगाव चौकामध्ये युवकांच्या डोक्यात फोडली बियरची वाटलीबार्शी |

बार्शी शहरालगत असणाऱ्या धस पिंपळगाव रोड चौकामध्ये एका तरुणाच्या डोक्यामध्ये बियरची बाटली मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ फेब्रुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. सचिन सुरेश शेंडगे (वय ३२) रा. लहुजीनगर, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज्ञा तिघांना विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हे त्यांच्या चुलत भावाचे बांधकाम बघण्यासाठी बायपास रोड बार्शी येथे गेले होते तिथून धस पिंपळगाव चौकामध्ये लघुशंकेसाठी थांबले असता २५ ते ३० वयोगटातील तिघांनी बियरची बाटली डोक्यात मारून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. व एका मोटरसायकल वरून बार्शीच्या दिशेने पळून गेले, फिर्यादीवर शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन ही तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज्ञात तिघांविरुद्ध भादवी कलम ३२३,३२४,३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments