"मी त्यांच्या कानाखाली वाजवेल...!" कपिलदेव ऋषभ पंतवर संतापले



मुंबई | 

भारताचे माजी कर्णधार कपिल देव  हे सध्या दुखापतग्रस्त असलेला खेळाडू रिषभ पंतवर चांगलेच भडकले आहेत. एवढंच नाही तर रागाच्या भरता मी रिषभच्या कानाखाली वाजवेन, असं कपिल देव म्हणालेत. रिषभ पंत  लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली वाजवेन, कारण त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे नियोजन खराब केलं. आजच्या तरुणांना अशा प्रकारची जोखीम घेण्याची काय गरज आहे? तरुण पिढीच्या अशा चुकांमुळे मला संताप येतो, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, ३० डिसेंबर २०२२ रोजी मध्यरात्री रिषभ पंत एकटाच गाडी चालवत दिल्ली येथून घरी जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला.

Post a Comment

0 Comments