शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची अवस्था होईल..? या बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चेला उदानमुंबई |

भाजप खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी बाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. स्वप्न पाहून शिवसेना  संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल, असं ते म्हणालेत. रणजीतसिंह निंबाळकर मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय. पक्ष शिल्लक ठेवणे ही त्यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरूप राहावा म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत आणि बॅनरबाजी करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments