पिकपच्या धडकेत एक जण ठार ; पिकअप चालकाविरोधात परंडा पोलिसात गुन्हा दाखल



परांडा |

मंगळवार पेठ, परंडा येथील- शमिम मोहम्मद शहाबर्फिवाले, वय 70 वर्षे, हे दि. 31.01.2023 रोजी 18.30 वा. सु. परंडा ते कुर्डुवाडी  रस्त्याने मुकरबा दर्गा समोरुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने पिकअप क्र. एम.एच. 25 एजे 0692 हा निष्काळजीपने चालवल्याने पायी जात असलेले शमिम यांना समोरुन धडकल्याने शमिम हे गंभीर जखमी होउन मयत झाले. 

या अपघातानंतर नमूद पिकअप चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- फिरोज शमिम शहाबर्फिवाले यांनी दि. 17.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments