'या' पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाला उतरवल्याची चर्चा...!



पुणे |

भाजप आमदार लक्ष्ण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप  विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे.

या दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे आणि महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत.

एकीकडे पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच याच पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा थेट मैदानात उतरणार आहेत. ही भाजपची मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या दरम्यान होणारा अमित शहांचा पुणे दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. पोटनिवडणुकीसाठी शहा देखील मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये.

Post a Comment

0 Comments