"सराफ व्यावसायिक मनोज पोतदार दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!"


बार्शी | 

बार्शी पंचक्रोशीतील नामवंत सराफ व्यावसायिक मनोज पोतदार व त्यांच्या पत्नी स्वाती पोतदार यांच्या हस्ते 8 जानेवारी रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. मनोज पोतदार हे गेल्या पंचवीस वर्षापासून सराफ व्यावसायिक म्हणून नावाजलेले नाव आहे. पोतदार यांचे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे 'बार्शीकर सराफ' या नावाने गेल्या 22 वर्षापासून तर बार्शीमध्ये गेल्या 3 वर्षापासून 'पोतदार ज्वेलर्स' या नावाने ग्राहकाच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण मनोज पोतदार व स्वाती या दाम्पत्यांने केले.

पोतदार हे सराफी चळवळीतील अग्रेसर असे नाव समजले जाते. मनोज पोतदार यांना दर्शन व यश दोन मुले आहेत. पुण्यातील नामांकित अशा गरवारे कॉलेज मध्ये शिक्षण आहे.

Post a Comment

0 Comments