देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस उलटली

सोलापूर |

मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा येथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले. तर २९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारी सकाळी ६ वाजता घडली.

भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूर कडे निघाली होती दरम्यान  फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली ट्रॅव्हल बस अतिवेगाने होती तसेच ड्रायव्हर मोबाईल वर बोलत असल्याचे जखमी भाविकांने यावेळी सांगितले  घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट  दिली असून जखमींना उपचारासाठी सोलापूर शहारातील शासकिय रुग्णालयात  दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments