कुबोटा ट्रॅक्टर विक्रीत बार्शीचे के. टी. ट्रॅक्टर्स जगात नंबर वन


बार्शी |

 जपान स्थित कुबोटा ॲग्रीकल्चर मशिनरी इंडिया कंपनीचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्हयाचे कुबोटा ट्रॅक्टरचे वितरक के.टी ट्रॅक्टर्स बार्शी यांना २०२२ या वर्षात ग्राहक सेवा, सेवा समर्थन, ग्राहक समाधान, शाखाविस्तार, सक्षम मनुष्यबळ, विक्रमी ट्रॅक्टर विक्री बाजारातील कुबोटा ट्रॅक्टरचा मार्केट शेअर आदी मापदंडामध्ये बाजी मारत उत्तमरीत्या कामकरीत सलग तिसऱ्यांदा ट्रॅक्टर विक्रीमध्ये जगामध्ये क्रमांक एक मिळवला आहे.
       
तालुक्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेल्या संतोष ठोंबरे यांनी २०१० साली बार्शीतील लातूर रोडवर के.टी ट्रॅक्टर हे कुबोटा कंपनीचे शोरुम सुरु केले अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करीत ट्रॅक्टर विक्रीमध्ये बाजी
मारण्यास सुरुवात केली त्यांच्याकडे सोलापूर व उस्मानाबाद या दोन जिल्हयाचे कार्यक्षेत्र असून दोन्ही जिल्हयातील २३ शाखांच्या माध्यमातून ठोंबरे यांनी २०२२ मध्ये सुध्दा १२५२ ट्रॅक्टरची विक्रमी विक्री केली आहे तर मागील दहा वर्षात त्यांनी ७५०० पेक्षा जास्त ट्रॅक्टरची विक्री करुन एक नवीन मापदंड तयार केला आहे.
            
 के.टी ट्रॅक्टरच्या जानेवारी २०२३मध्ये झालेल्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये कंपनीचे झोनल मॅनेजर सचिन राजमाने यांनी के. टी ट्रॅक्टरने ग्राहकांना दिलेली सेवा, सव्हिस सपोर्ट, ग्राहकांचे समाधान, शाखाविस्तार, व सक्षम मनुष्यबळ, बाजारातील कंपनीचा मार्केट

शेअर वाढवल्याबद्दल कौतुक केले 
देशातील विविध राज्यामध्ये कपंनीचे सुमारे ३५० पेक्षा जास्त डिलर आहेत. या डिलरमध्ये के. टी ट्रॅक्टर्सने सर्वाधिक विक्री केली आहे. ठोंबरे यांनी केवळ विक्री वाढवून पैशाचा विचार न करता ग्राहकांच्या समाधानाला नेहमीच प्राधान्य दिले आहे तसेच त्यांनी विक्री वाढवताना कंपनीचा या दोन जिल्ह्यामध्ये मार्केट शेअर देखील वाढवला आहे. त्यांनी केवळ देशामध्ये नव्हे तर संपुर्ण जगामध्ये असलेल्या कुबोटा कंपनीच्या डिलरमध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे ठोंबरे यांच्यासारखे डिलर आमच्या कंपनीला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

सचिन राजमाने झोनल मॅनेजर कुबोटा ट्रॅक्टर उद्योगासोबत सामाजिक कार्यात ही अग्रेसर उद्योगामध्ये अग्रेसर असलेल्या संतोष ठोंबरे यांनी सामाजिक कामात देखील आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे मातृभूमी प्रतिष्ठाण, सहयोग स्थानिक रहिवाशी मंडळ, भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी, बार्शी तालुका क्रिकेट असो, आदी संस्थांचे अध्यक्ष म्हणून देखील ते प्रभावीपणे लोकहिताचे काम करीत असून बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय करीत असताना संतोष ठोंबरे यांनी केलेली ही देश व जागतिक पातळीवरील कामगिरी निश्चीतच बार्शीकरांसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ग्राहकांना दिली जात असलेली घरपोच व तात्काळ सेवा, हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असलेले स्पेअर पार्ट, अनुभवी व प्रशिक्षीत मॅकेनिक, कर्मचारी वृद व सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असून या सर्व यशाचे श्रेय हे ग्राहकांचा के टी ट्रॅक्टर्सवर असलेला विश्वास, कर्मचाऱ्यांनी ही हे आपलेच शोरुम आहे असे समजून दिलेले योगदान, यामुळे हे यश संपादन करू शकलो असे  संतोष ठोंबरे यांनी सांगितले..

Post a Comment

0 Comments