सुर्डी- मालवंडी हद्दीवर एसटीचा अपघात; सुदैवाने जीवितहानी झाली
वैराग |

माढा रोड वर आज सकाळी १० च्या सुमारास सुर्डी - मालवंडीच्या हद्दीवर एस.टी. चा अपघात झाला. ३५ प्रवासी या बस मधुन प्रवास करत होते. परंतु सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. किरकोळ जखमींना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात पाठवण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार एस.टी. च्या टेरिंग चा रॉड तुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटला. परिणामी एस.टी. रस्त्यावरुन खाली जात विजेच्या खांब्यावर आदळत पलटी झाली. 

म्हणुन... शाळकरी मुले व वृद्ध प्रवासी वाचले

सुर्डी ते मालवंडी रस्ता जास्त खड्डेमय असल्याने वाहने हळू वेगात चालवावी लागतात. त्यामुळे बस चा मोठा अपघात टळला. सकाळची वेळ असल्याने बस मध्ये जवळपास १५ शाळकरी विद्यार्थी प्रवास करित होते व इतर वृद्ध सहप्रवाशी होते. सुदैवाने अपघाताची तिव्रता जास्त न जाणवल्याने प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments