बार्शी न्यायालयाच्या आवारातून लघुशंकेचे निमित्त करून बेडीसह आरोपी फरारबार्शी |

बार्शी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या आरोपीने चक्क न्यायालयाच्या आवारातून धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे, बनावट चलनी नोटा प्रकरणी सदरील आरोपी सोलापूर कारागृहात होता, १९ जानेवारी रोजी दुपारी २ च्या दरम्यान पोलिसांना चकवा देऊन त्यांनी पळ काढला. 

गेला काही दिवसापूर्वी बनावट चलनी नोटा प्रकरणी सदर आरोपीवर टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माढा तालुक्यातील बारलोणी येथील सिद्धेश्वर शिवाजी केचे बनावट चलनी नोटा प्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता, टेंभुर्णी पोलिसांनी त्याला अटक करून सोलापूर येथील कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.

या घटनेची फिर्याद बार्शी शहर पोलिसात मोतीराम हरिचंद्र पवार यांनी दिली आहे त्यानुसार सदर आरोपीवर भादवी कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments