शिक्षकाचे लज्जास्पद वर्तन, पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल


बार्शी  |

शहरातील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुलमधील एका विद्यार्थीनीसोबत शाळेतील शिक्षकाने अश्लील वर्तन केले. याप्रकरणी, मुलीच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपाला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

येथील गाताची वाडी परिसरातील इंग्लिश मिडीयम स्कुलमधील इंग्लिश विषयाचा शिक्षक राजेश सर याने 8 वीच्या वर्गातील मुलीशी मोबाईल आणि सोशल मीडिया एपवरून चॅटिंग केले. त्यामध्ये, अल्पवयीन मुलीस लज्जास्पद मेसेज करण्यात आले होते. याबाबत मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली. आरोपी राजेश सर याच्याविरुद्ध पोक्सो कलम 354 D, 506, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments