सोलापूर |
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन जणांवर कारवाई केली आहे.
आरोपी लोकसेवक १) रणजीत मारुती मोरे, वय ३७ वर्षे पद- मंडळ अधिकारी, तहसिल पंढरपूर २) खाजगी इसम शरद रामचंद्र मोरे वय ३७ वर्षे व्यवसाय शेती, रा. तुंगत ता. पंढरपूर जि. सोलापूर अशी लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी मुरुम उत्खननाबाबत तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेला जेसीबी दि. १५.०१.२०२३ रोजी ताब्यात घेवून तक्रारदार यांच्या टीपर ट्रक मधुन चोरीच्या मुरुमची वाहतुक झाली असल्याबाबत सांगुन त्यावरुन तक्रारदार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी अथवा कोणताही दंड न आकारता ताब्यात असलेला जेसीबी सोडण्यासाठी १ लाख रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारली असता नमुद आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक,पोहवा सोनवणे, पोना प्रमोद पकाले पोना अतुल घाडगे,पोकों स्वप्नील सन्नके, व चालक शाम सुरवसे सर्व नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments