राहुल गांधींना थंडी का वाजत नाही? टीशर्ट आला ट्रेंडिंगमध्ये!


दिल्ली |

भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी महात्मा गांधींच्या स्मारकाला भेट दिली. तसेच माजी पंतप्रधानांच्या स्मृतीस्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे दिल्लीत सध्या प्रचंड थंडी असतानाही राहुल गांधींनी केवळ टीशर्टचं परिधान केलं होतं.

दिल्लीत लाल किल्ला परिसरात सभेदरम्यान बोलतानाही राहुल गांधींनी आपल्याला पत्रकार विचारतात की तुम्हाला थंडी का वाजत नाही, असं सांगितलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, तुम्ही शेतकऱ्यांना आणि मजुरांना असा प्रश्न विचाराल का? दरम्यान, या घडामोडींनंतर दिल्लीतील सध्याचं ९ डिग्री तापमान आणि राहुल गांधींचं टीशर्ट ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. कारण कडाक्याच्या थंडीतही कोणतेही गरमीचे कपडे न घालता केवळ एका टीशर्टवर राहुल गांधी दिसत आहे. पण यामागचं कारणंही त्यांनी सांगितल आहे की, ज्या लोकांना कपडेही घालायला मिळत नाहीत त्यांच्यासाठी आपण केवळ टीशर्टचं घालत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवर अनेकांनी राहुल गांधींच्या एनर्जीचं आणि फिटनेसचं कारण काय असं विचारलं आहे? तर दुसऱ्या एकानं म्हटलं की, राहुल गांधींना पंतप्रधान बनवा कारण ते थंडीतही केवळ टीशर्टच घालून फिरत आहेत. एका एकानं त्यांना खोचक टोला लगावताना खरोखऱच पैशांमध्ये खूपच उब असते असं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments