टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण; सोलापूर कोल्हापूर टोलनाक्यावरील मारहाण सीसीटीव्ही कॅमेरात कैदसोलापूर |

सोलापूर-सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बेगमपूर टोल नाक्यावर एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण झाली आहे. अजरोद्दीन रसूल फुलारी (वय 26 वर्ष,रा,बेगमपूर, सोलापूर) असे जखमी झालेल्या टोल कर्मचाऱ्याचे नाव आहे.कामती पोलीस स्टेशन येथे या टोल कर्मचाऱ्याने फिर्याद दिली असून मारहाण करणाऱ्याचा तपास सुरू आहे.

याबाबत अजरोद्दीन फुलारी यांनी माहिती देताना सांगितले की, बेगमपूर येथील वाळू तस्करांनी मला मारहाण केली आहे.आणि ते नेहमीच टोलवर येऊन दमदाटी करतात ,टोल न देता वाहने घेऊन जातात. मारहाणीची ही घटना ,शनिवारी 17 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी ताबडतोब मारहाण करणाऱ्याना अटक करावी अशी मागणी टोल कर्मचाऱ्याने केली आहे.याबाबत कामती पोलीस ठाणे येथे अस्लम चौधरी,जाकीर चौधरी,आरिफ पठाण ,मोहसीन पठाण,अमीर पठाण,सर्फराज तांडेल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments