वैराग मधील अश्वारूढ पुतळ्याच्या परवानगी संदर्भात जिल्हाधिकारी समवेत बैठक



वैराग |

वैराग मधील प्रलंबित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या परवानगी संदर्भामध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांच्याबरोबर मीटिंग घेण्यात आली, सदर परवानगीच्या अनुषंगाने कागदाची पूर्तता केल्यास लवकरच परवानगी देऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिले.

यावेळेस 19 फेब्रुवारी 2022 च्या अगोदर शिवजयंतीचे औचित्य साधून पुतळाव्याचे अनावरण केले जाईल असा ठाम विश्वास आमदार राजभाऊ राऊत यांनी उपस्थित शिवस्मारक समितीला दिला. यावेळेस वैराग भागाचे नेते संतोष दादा निंबाळकर, उपनगराध्यक्ष संजय भुमकर, सभापती नागनाथ वाघ, नगरसेवक अतुल मोहिते ,वैजनाथ आदमाने, बाबासाहेब रेड्डी ,भैय्या देशमुख, प्रफुल्ल भारशंकर, गोविंद ताटे ,सतीश सुरवसे , रोप बागवान , आनंद घोटकर शिवस्मारक समितीचे नानासाहेब डोले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments