गोवंशाचे वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई ; दोघांवर वैराग पोलिसांत गुन्हा दाखल



वैराग |

वैराग जवळील रुई येथे अवैद्यरित्या कत्तलीसाठी ४ मोठ्या जरश्या गाई व ११ वासरे घेऊन जाणाऱ्या पिकअपमध्ये घेऊन जात असताना अडवून सदरचे गोरक्षणाचे काम करणाऱ्या
सिध्दाराम कृष्णहरी चरकुपल्ली (वय ३०)वर्षे धंदा- टेलर व जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी सोलापुर चा अशासकीय सदस्य रा. जुना विडी घरकुल हैद्रबादरोड सोलापुर यांनी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीनुसार  जाबीद जब्बार कुरेशी रा. बुधवार पेठ मोहोळ नबीलाल अब्दुल कुरेशी रा. मोहोळ या दोघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पिकअप व जनावरे असा तीन लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी, तरी दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास मौजे रूई ता बार्शी येथील शिवारात रस्त्यावर पीक अप नंबर पाहता नंबर एम. एच १३ ए एन ९६६९ नमुद वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने जनावरे कोंबुन जनावरांना वेदना होईल अशा परस्थितीत कमी रुंदिच्या जागेत जनावरांना हालचाल करता येणार नाही तसेच सदर वाहनात जनावरांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नसताना अशा पध्दतीने प्रत्येक जनावरांचे आमानुशपणे निर्दयीपणे चारही पाय व मान दोरीने पीक अपच्या साईडच्या लोखंडी पाईपला बांधुन कोंबुन भरलेले दिसले व सदरचे जनावरे ही कत्तलीसाठी घेवुन जात होते ती जनावरे पोलीसांचे मदतीने गोशाळेमध्ये जमा करत आहोत. 

Post a Comment

0 Comments