"प्रतिथयश उद्योजक संतोष ठोंबरे यांनी केले सपत्नीक अन्नपूर्णा योजनेचे पूजन...!"


बार्शी |

कृषी पूरक व्यवसायात जागतिक विक्रम घडवणाऱ्या के.टी. ट्रॅक्टर सर्वेसर्वा, मातृभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख तथा बार्शी येथील प्रतित यश उद्योजक संतोष ठोंबरे व सौ. माधुरी संतोष ठोंबरे या दाम्पत्याच्या हस्ते अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोष ठोंबरे यांनी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर शांत डोक्‍याने मात केली. टप्प्याटप्प्याने यशाची एक-एक पायरी चढत राहले. अपार परिश्रम आणि ध्येयनिष्ठने प्रत्येक पायरीवर समाजासाठी प्रामाणिकपणे निश्‍चित काहीतरी करण्याचे भान ठेवून संतोष काका ठोंबरे हे मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. संतोष ठोंबरे यांच्या पत्नी माधुरी यांचा यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्योग जगतात संतोष काका ठोंबरे यांचे आग्रणी नाव आहे, कोरोनाचे संकट डोक्यावर असताना गतवर्षी त्यांनी जिद्दीने शेतकरी बांधवांना नवा विश्वास देत ‘कुबोटा’ ट्रॅक्‍टर विक्रीत भारतात नव्हे तर जगात पहिला नंबर संपादन केला आहे. याशिवाय मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दातृत्वाचे कामही ते करत आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना ही गेल्या सात वर्षापासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरच्या मदतीने अविरत सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज सुमारे २०० निराधार लोकांना दोन वेळचे अन्न नि:शुल्क केले घरपोच केले जाते. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित केले जाते. गरजू व गोरगरिबांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी योजना ही मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवली जाते.

Post a Comment

0 Comments