पोकलेनचालकास लोखंडी रॉडने मारहाण, भराडीया विरुद्ध गुन्हा दाखल


बार्शी |

शहरातील बांधकाम व्यावसायिक व भराडीया स्टोन क्रशर चालक शिवम सुनील भराडीया याच्यासह दोघांविरुद्ध लोखंडी गजाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. 

यासंदर्भात मेहबूब मिया शेख यांच्या फिर्यादीवरून भादवि 394, 326, 504, 506 नुसार उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस फिर्यादीनुसार, मेहबूब शेख हे पोकलेन चालविण्याचा व्यवसाय करतात. 3 डिसेंबर रोजी फिर्यादी  उस्मानाबाद शिवारातील वैराग रोडलगत असलेल्या नबीलाल यांच्या शेतात पोकलेन चालवण्याचे काम करीत होते, त्यावेळी शिवम भराडीया, आद्या (नाव माहीत नाही) आणि एक अज्ञात असे तिघेजण चारचाकी गाडीतून तिथे आले. त्यानंतर, मी तुझ्या पोकलेनचा हफ्ता भरत नाही, असे म्हणत शिवम याने शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी गजाने मारहाण केली. तर, त्यासोबतच्या दोघांनी मला धरले होते. यात माझ्या डोक्याला जखम झाली, असा जबाब फिर्यादीने दिला आहे. तसेच, यावेळी, शिवमने माझ्या जवळील 1 लाख 20  हजार रोख रक्कम आणि गळ्यातील 3 तोळ्याची चैन व सॅमसंग नोट मोबाईल असा एकूण 2 लाख 90 रुपये किमतीचा ऐवज नेला, असे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments