सोलापुरात भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावर शाईफेक



सोलापूर |

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. पिंपरी चिंचवड मध्ये त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. आंबेडकरी जनतेतून चंद्रकांत पाटील यांच्याबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या, त्यांचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे.

 हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावरही शाई फेकण्यात आल्याची  माहिती मिळत आहे. सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवार पेठ येथील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान यांच्यावतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मंगळवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते. 
त्या सोहळ्याला माजी आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून आली  होते. ते त्याठिकाणी गेले असता एका भीमसैनिकाकडून माजी आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्या युवकाला जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले . याप्रकरणी काही पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारले असता सार्वजनिक कार्यक्रमात असे होते, समाजाच्या मी भावना समजू शकतो. असे सांगून शाई फेक झाली असली तरी आमदार देशमुख हे शर्ट बदलून मोठ्या मनाने त्या कार्यक्रमाला तिथेच थांबले आहेत अशी माहिती मिळाली.

 शाई फेकणाऱ्या आरोपीस अटक केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कर्मचारी काम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments