अक्कलकोट |
अक्कलकोट तालुक्यातील गौडगांव बु येथील श्री जागृत मारुती मंदिराचे गेटचे कुलूप व आतील गाभा-याचे दरवाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडली आहे. पोलीसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे सांगितले.
शनिवारी ( ३ डिसेंबर) रात्री ११ ते आज रविवारी (४ डिसेंबर ) पहाटे च्या सुमारास चोरट्याने प्रवेश करुन चोरी केल्याची माहिती आहे. दानपेट्यांचे व लोखंडी कपाटाचे व त्यातील स्टीलचे लहान पेट्याचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरुन नेले. अज्ञात चोरट्याविरुद्ध दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. देवस्थानचे सचिव प्रकाश मेंथे (वय ५६ वर्षे) यांनी फिर्याद दिली.
याबाबत दक्षिण पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील श्री जागृत मारुती मंदिरात दर्शनाकरीता येणारे लोकांसाठी मंदिरात दानपेट्या ठेवलेल्या आहेत ती मंदिराचे विकासासाठी दोन ते तीन महिन्यानी सदर दानपेटीतील रक्कम काढली जाते. या दानपेटीस कुलुप लावलेले असतात. शनिवारी रात्री ११ वाजता देवस्थानची दिवसभर विधीवत पुजा करुन सचिव व मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर नागेशी फुलारी व मंदिराचे सेवेकरी श्रीमंत सिध्दप्पा सावळतोट असे मंदिरातील लोखंडी कपाटात अन्नक्षेत्रातील व मंदिरातील पावती टेबलवरील स्टीलचे लहान ०६ डबे लोखंडी कपाटात ठेवुन कपाटास लॉक केले तसेच मंदिराचे व मंदिराचे बाहेरील सभामंडपाचे गेट यांना कुलुप लावुन घरी गेले.
रविवारी पहाटे ०५. १५ वाचे सुमारास मंदिराचे साफसफाई करणे करीता गेले असता मंदिराचे बाहेरील गेट उघडे दिसले व मंदिराचे गाभा-याचे दरवाजा देखील उघडे असल्याचे दिसले व बाजुस तुटलेले कुलुप पडले होते. आत जावुन पाहिले असता मंदिरातील असलेल्या दानपेट्या व लोखंडी कपाटात ठेवलेली लहान स्टीलच्या दानपेट्या सर्व कुलुप तोडुन पडलेले दिसले व दानपेटीमधील सर्व रक्कम चोरून पोबारा केल्याचे प्रथमदर्शनी दिसले.
गावातील सरपंच श्रीशैल बनसोडे, उपसरपंच विरभद्र सलगरे, माजी सोसायटी चेअरमन शंकर पाटील, पोलीस पाटील सिध्दाराम सुतार व ज्ञानेश्वर नागेशी फुलारी व गावातील काही प्रतिष्ठीत लोक असे मिळून मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम चोरीस गेल्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यास फोन करुन सांगितले. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेस तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
श्रीकांत खानापूरे (अध्यक्ष देवस्थान) यांनी मंदिरात सीसीटीव्ही सुरू आहे. पण पंधरा दिवसाआधीच डीडीआर बदलले आहे. त्यामुळे रेकाँर्डिंक झाले नाही. तपासायला दिल्याचे सांगितले.
0 Comments