सोलापूर | महिलेने दिला चक्क तीन बाळाला जन्म ; आईसह बाळाची प्रकृती ठणठणीत


सोलापूर |

आजतागायत महिलेने एकावेळी दोन अपत्यांना जन्म दिल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, नुकतेच शहरातील विजापूर नाका येथील यजुर्वेदी हॉस्पिटल येथे माजी सैनिक नगर विजापूर रोड येथील रहिवासी महिलेने चक्क तीन बाळांना जन्म दिल्याची आनंददायी बाब समोर आली आहे. यात दोन मुली व एका मुलाचा समावेश असून विशेष म्हणजे तीन बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे.

यजुर्वेदी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय गीतांजली प्रकाश तांदळवाडी यांना प्रसूतीसाठी २७ डिसेंबरला दाखल केले होते. दुपारी एक वाजून २० मिनिटांनी एकापाठोपाठ तीन अपत्यांना जन्म दिला. जन्म वेळेत १ - १ मिनिटांचे अंतर आहे. या तीन अपत्यांमध्ये प्रामुख्याने दोन मुली आणि एक मुलगा आहे. या अपत्यांची प्रकृती चांगली असून वजन अनुक्रमे पहिले २ किलो ४०० ग्रॅम, दुसरे २ किलो २०० ग्रॅम व तिसरे १ किलो ८०० ग्रॅम असे आहे. यापूर्वी गीतांजली ला दोन अपत्य आहेत. ही प्रसूती डॉ. श्रुती यजुर्वेदी व आशुतोष यजुर्वेदी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments