बार्शी |
बार्शी ग्रामपंचायत निवडणूकीत मतदाना आधीच भाजपची विजयी सलामी.गाडेगाव ग्रामपंचायत बिनविरोध आमदार राजाभाऊ राऊत यांच्या ताब्यात..
ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला असून सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नवीन सरपंच व विजयी सदस्यांचा आमदार राजाभाऊ राऊत यांनी सत्कार केला.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरत असून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत मतदाना आधी विजय मिळवला तो आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने.
गौडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कौसर मुलाणी यांची निवड झाली आहे. हे सरपंच पद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते,सदस्य म्हणून गजानन बोराडे,रूपाली बोराडे,मेघा पाटील,गणेश नागणे,शमा मुलाणी,अमोल भालके,कविता गवळी यांची बिनविरोध निवड झाली.
0 Comments