मनगोळीचे पत्रकार नारायण घंटे 'विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्काराने' इंदिरानगर येथे सन्मानितसोलापूर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील पत्रकार नारायण घंटे यांना 'विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्काराने' आज रविवारी विजापूर रोडवरील इंदिरा नगरातील इंदिरा सभागृहात सन्मानित करण्यात आले.नामदेवराव भालशंकर गौरव समिती मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन आणि सम्यक्य अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा संपत्निक सत्कार करण्यात आला.मिळालेल्या पुरस्काराने आणखीन जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली,असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.

या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव,जैन गुरुकुल प्रशालाचे प्राचार्य आशुतोष शहा,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभुषण अण्णासाहेब भालशंकर,राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड,बाळासाहेब डोळसे,रमेश लोखंडे,जिल्हाध्यक्ष युवराज भोसले,जिल्हा सचिव रवी देवकर,जिल्हा सहसचिव,प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर,उपप्रचार्य प्रकाश शिंदे,नानासाहेब भालशंकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments