महाराष्ट्रात पहिल्यांदाच केजरीवालांच्या 'आप'ची एन्ट्रीराज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत सध्या एका ग्रामपंचायतीच्या निकालाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.

याचं कारण म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा सरपंच निवडून आला आहे. भंडाऱ्यात आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच खाते खोलले आहे. पाथरी ग्रामपंचायतीत सरपंच पदाकरिता आम आदमी पार्टीच्या विद्या गुरुदास कोहळे या विजयी झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments