मरहुम. नसरुद्दीन कौठाळकर यांच्या जयंतीनिमित्त उर्दू शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटप



वैराग येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू मुला मुलींची शाळेमध्ये मरहुम जनाब नसरुद्दीन कौठाळकर यांच्या जयंतीनिमित्त वही पेन व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैराग नगरपंचायतीचे नगरसेवक श्रीशैल मच्छिंद्र भालशंकर व  मैनुद्दीन सय्यद(कौठाळकर ) यांच्या हस्ते नसरुद्दीन कौठाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर पिराजी सोनवणे यांनी मरहुम जनाब नसरुद्दीन कौठाळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची आठवणीला उजाळा देऊन विजय न्युज परिवार यांनी त्याच्यां पावलावर पाऊल टाकुन त्याच्यां उर्वरित राहील्या कामाची उनिव भरून काढावी.

 पुढे बोलताना ते म्हणाले महरूम नसरुद्दीन कौठाळकर यांचे चिरंजीव विजय न्यूज चैनल संपादक मुजम्मिल कौठाळकर यांनी वडिलांचे राहिलेले कार्य करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करावा यावेळी विजय न्यूज परिवाराच्या वतीने शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वही पेन खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

 यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळा शाळेच्या मुख्याध्यापिका शाईन शेख सहाय्यक शिक्षक शबाना शेख व सहाय्यक शिक्षक जनाब नफीस उस्ताद सह विजय न्यूज परिवाराचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवटी आलेल्या पाहुण्यांचे व विजय परिवाराचे  सहाय्यक शिक्षक जनाब नफीस उस्ताद यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रियाज सय्यद ( कौठाळकर) , समीर कौठाळकर ,अमीर दरवाजकर आब्बाजान कौठाळकर  , फरहान कौठाळकर आदींनी परिश्रम केले.

Post a Comment

0 Comments