भाजपला मोठं खिंडार; दिग्गज नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश


मुंबई |

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. औरंगाबादमधील भाजपच्या दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचं मशाल चिन्ह हाती घेतलं आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. ही फूटनभरून काढण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे करत आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह राष्ट्रवादीच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत खेचून आणलं आहे.

यामध्ये भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुसरीकडे दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेत खेचून आणलं आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अँड. प्रतापराव पाटील निंबाळकर, ( तालुका अध्यक्ष पंचायत समिती), प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, कृ. उ.बा.स.यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments