तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध ; आमदार राजेंद्र राऊत यांची यशस्वी घौडदौड सुरू



बार्शी |

बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील बेलगाव,देवगाव व गाडेगाव या तिन ग्रामपंचायती बिनविरोध भाजपकडे आल्या आहेत.
    
आमदार राजाभाऊ राऊत यांचे यांचे भक्कम पाठबळ यामुळे बेलगाव,देवगाव व गाडेगाव या ग्रामपंचायती बिनविरोध करत भाजपवर ग्रामस्थांनी विश्वास दाखवला असून आगामी काळात गावच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता अपेक्षित विकास घडवून आणला जाईल व विकासासाठी पुर्ण सहकार्य केले जाईल असे राजाभाऊंनी सांगितले.
   
ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासह ८ ग्रामपंचायत सदस्य,देवगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासह १० ग्रामपंचायत सदस्य व गाडेगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासह ९ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 
     
 गौडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कौसर मुलाणी तर सदस्य म्हणून गजानन बोराडे,रूपाली बोराडे,मेघा पाटील,गणेश नागणे,शमा मुलाणी,अमोल भालके,कविता गवळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
     
 देवगाव ग्रामपंचायत सरपंच पदी फिरोज बडेमिया तर सदस्य म्हणून शेखर मारकड,हनुमंत पाटील,सुमन चव्हाण,संदिप मांजरे,शीला जगताप,शैला मांजरे,प्रकाश मांजरे,रेणुका मारकड,शैलजा मांजरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 बेलगाव ग्रामपंचायत सरपंच पदी जालिंदर भालेराव तर सदस्य म्हणून सुधाकर शेळके,किरण शेळके,दयानंद पाटील,केशरबाई मांगडे,उषाबाई पवार,नंदाबाई कांबळे, जिजाबाई थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे, या सर्वांचा आमदार राजाभाऊ राऊत यांनी सत्कार केला.

Post a Comment

0 Comments