राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 26 जानेवारी 2023 पूर्वी?मुंबई |

महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पाय उतार करून सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर म्हणजे 26 जानेवारी 2023 पूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिले दोन महिने एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोघेजण कॅबिनेटचे निर्णय घेत होते त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र त्यात अनेकांची वर्णी लागली नाही, त्यांना दुसऱ्या विस्तारा स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले परंतु सातत्याने तारीख पे तारीख मिळत असल्याने भाजप सहित शिंदे गटातील अनेक जण नाराज झाले आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत राज्य मंत्रिमंडळात नऊ मंत्री शिंदे गटाचे नऊ मंत्री भाजपाचे आहेत मात्र शिंदे गटातील नऊ जणांना अपेक्षेप्रमाणे खाती मिळाली नसल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराज आहे, तशीच नाराजी शिंदे गटातील अनेक आमदार मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत त्यांच्यात देखील मंत्रीपद मिळण्यावरून जोरदार लॉबिंग चालू आहे शिंदे गटातील अनेक आमदार आठ दिवसात मंत्री होणार जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार अशा अविर्भावात जाहीर सभांमधून घोषणा करत फिरत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यांनी मंत्रिपदासाठी कपड्यांची खरेदी देखील केली आहे तर काही आमदार मंत्री झाल्यानंतर कोणता बंगला मिळणार त्या स्वप्नात खुशीत गाजरे खात आहेत शिंदे गटातील ज्या आमदारांना मंत्री करायचे त्यांनी मंत्री होण्याअगोदरच मुख्यमंत्री शिंदे व भाजपाला काही महिन्यात केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत आणले आहे. त्यामुळे त्या आमदारांना मंत्री केले तर सरकारला अडचणीचे ठरणार आहे, तसेच त्यांची नाराजी देखील शिंदे सरकारला धोक्याची असल्याने ते आमदार असून अडचण नसून खोळंबा झाला आहे.

राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आले परंतु मंत्रिमंडळ पूर्ण क्षमतेने न केल्याने या सरकारला 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडावा लागला, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून मुंबई मंत्रालय देवेंद्र फडणवीस नागपूर, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, राधाकृष्ण विखे पाटील ,अहमदनगर गिरीश महाजन वाशिम, दादा भुसे धुळे, गुलाबराव पाटील जळगाव, रवींद्र चव्हाण ठाणे, मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगर, दीपक केसरकर सिंधुदुर्ग, उदय सामंत रत्नागिरी ,अतुल सावे परभणी ,संदिपान भुमरे औरंगाबाद ,सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावित नंदुरबार ,तानाजी सावंत उस्मानाबाद ,शंभूराज देसाई सातारा ,अब्दुल सत्तार जालना, संजय राठोड यवतमाळ. एवढ्या मंत्र्यांनाच फक्त ध्वजारोहणाचा मान मिळाला उर्वरित 16 जिल्ह्यात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले. अमरावती, विभागीय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली ,अकोला, सोलापूर, लातूर ,वाशिम, बुलढाणा ,पालघर ,नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

13 जानेवारी याचिकांवर सुनावणी त्यावरच मंत्रिमंडळाचे विस्ताराचे भवितव्य

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर नवीन वर्षात 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे, यावर काय निर्णय लागतो त्या कारणासाठीच मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या निर्णयानंतरच राज्यातील शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या निर्णयानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार खऱ्या अर्थाने होईल जर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर 26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर होईल यात मात्र शंका नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments