सोलापूर |
सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री दशरथ वाकोडे (वय २० रा. दीक्षित नगर भाग ४ म्हेत्रे वीट भट्टी जवळ सोलापूर) ही तरुणी भाजीपाला आणण्यासाठी गेली पण ती परत आलीच नाही अशी नोंद एमआयडीसी पोलीस ठाणे येथे झाली आहे. हेमा अंबादास वाकोडे यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
भाग्यश्री दशरथ वाकोडे ही तरुणी भाजीपाला आणण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी भाग्यश्री राहत्या घरातून ९: ३० वाजता गेली. आजतागायत परत आलीच नाही. यामुळे घरातील इतर सदस्यांनी भाग्यश्रीची सर्व ठिकाणी चौकशी केली. सर्व नातेवाईकांकडे विचारपूस केली त्याचा ठावठिकाणा लागला नाही. शेवटी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हेमा अंबादास वाकोडे यांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक साळुंखे हे करत आहेत.
0 Comments