बार्शी |
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवामध्ये महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.जालना येथील यशस्वी महिला शेतकरी व उद्योजिका कृषिरत्न सीताबाई मोहिते यांचे व्याख्यान पार पडले, उपस्थित महिला शेतकरी भगिनींना त्यांनी मार्गदर्शन केले.
कविताताई राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमावेळी समाजसेविका व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांचा कविताताई राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी मार्गदर्शन केले, याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला धनश्री ताई खटके, राजश्री तलवार-डमरे, पद्मजा काळे, उमादेवी सुभाष आवारे, सुगंधा आगवणे, रूपाली राजेंद्र ढगे, राजश्री नागजी कातुरे, डिंपल सुरवसे , सोनल होनमाने, ध्रुपदा चव्हाण, योजना पवार, राजश्री शिंदे, रजिया बागवान, भगीरथी त्रिंबक, मनीषा पोकळे, शोभा मोरे, पुष्पा वाघमारे, आशा लोंढे, कुसुम सुर्वे, विद्या पवार,शबाना तांबोळी, कल्पना गायकवाड, संगीता लांडे तसेच शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments