मुंबई |
मरोळ येथील एका मदरशातील अरबी शिक्षकावर रविवारी त्याच्या 12 वर्षीय विद्यार्थिनील लोखंडी रॉडने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक अली असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुंबईतील सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास मरोळ पाइपलाइनजवळील गौसिया मदरशामध्ये ही घटना घडली. आरोपी शिक्षक तौफिक अली यांनी त्यांच्या शिकवणी दरम्यान विद्यार्थीनीने गप्पा मारल्याने शिक्षकाने हिंसक कृत्यू केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
आरोपी शिक्षकाने लोखंडी रॉड उचलला आणि सादिका खान या 12 वर्षीय विद्यार्थिनीला मारहाण केली. सादिकाच्या खांद्याला मार लागला असून तिला दुखापत झाली आहे. शिकवणी नंतर घरी गेल्यावर तिने तिच्या पालकांना ही गोष्ट सांगितली.
त्यानंतर तिचे वडील शिराज खान तिला तपासणीसाठी स्थानिक दवाखान्यात घेऊन गेले आणि रविवारी संध्याकाळी उशिरा पोलीस ठाण्यात गेले. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, सहार पोलिसांनी आरोपी शिक्षक तौफिकवर भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. पीडितेवर वैद्यकीय उपचार सुरू असून ती धोक्याबाहेर आहे.अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
0 Comments