सोलापूर |
सोलापुरातील बुधवार बाजार परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये औषध प्रतिनिधी व डॉक्टर पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. जुनेद सलीम शेख (वय 29 टरा, बुधवार बाजार,सोलापूर) असे युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे 16 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. वर्षभरापूर्वीच एका डेंटिस्ट डॉक्टर तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जुनेद शेख या युवक डिप्रेशनमध्ये होता. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
पहाटे त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; डोक्यावरच खाली पढला- जुनेद शेख हा,गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून
मानसिक तणावात होता. एका मल्टिनॅशनल कंपनीत तो औषध प्रतिनिधी म्हणू नोकरी करत होता. नोकरीवर असताना त्याचे डेंटिस्ट डॉक्टर तरुणीसोबत विवाह झाले होते. काही कारणास्तव त्याने मल्टीनॅशनल कंपनीमधील नोकरी सोडून तो एका छोट्या कंपनीत नोकरी करत होता. तसेच एका मेडिकल शॉपचे कामकाज देखील पाहत होता. बुधवारी पहाटे 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्याने बुधवार बाजार येथील राहत्या घरी अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्या उडी मारून आत्महत्या केली. त्याने उडी मारल्या नंतर तो सरळ डोक्यावर खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केले- पहाटेच्या सुमारास जुनेदने उडी मारली होती. आजूबाजूला असलेले नागरिक साखर झोपेत होते. जुनेदच्या कुटुंबीयांना देखील याबाबत माहिती नव्हती.खाली पडल्यानंतर काही वेळ जुनेद निपचित अवस्थेत पडून होता.ज्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी पाहिले ताबडतोब त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण डॉक्टरांनी जुनेदला मृत घोषित केले. शवविच्छेदन साठी मृतदेह पाठविण्यात आले, बुधवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास त्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
0 Comments