बार्शी तालुक्यात खरीप सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते, या पिकामुळेच शेतकऱ्यांना दोन पैसा उत्पन्न मिळते, पण तालुक्यात चालू वर्षी पाऊस उशिरा आल्याने खरीप पिकाची पेरणी वेळेत झाली नाही. पाऊस पडल्यानंतर सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर पिकावर गोगलगायी व किडीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सततधार पाऊस पडल्याने पिकाची वाढ न होणे, पिकाचा फुलोरा गळणे, सोयाबीनच्या झाडाला शेंगा नसणे, असतील तर ती शेंगा कमी असणे, लहान असणे अशा अनेक कारणामुळे चालू वर्षी पिकाचे नुकसान झालेली आहे.
खरीप पिकाच्या नुकसानीमुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सोयाबीन व इतर पिकासाठी अनुदान दिले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना चालू वर्षी खरीप पिकासाठी पिक विमा २५ ते ३० हजार रुपये हेक्टरी मेळावा. जर पिक विमा पिकाच्या नुकसानी प्रमाणे नाही मिळाला तर, पिक विमा कंपनी जबाबदार धरून जिल्हा कृषी कार्यालयावर तालुक्याच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा बार्शी तालुक्यातील शेतक-यांनी बाळासाहेब शिंदे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केला आहे. यावेळी राहुल भड, भास्कर काकडे, लता यादव, बबीता काळे आदी उपस्थित होते.
0 Comments