बार्शी |
लग्नामध्ये मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तीसह सासू-सासर्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , याबाबत विवाहिता अश्विनी निरंजन करणे (वय 30) सध्या रा. झाडबुके मैदान बार्शी यांनी शहर फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नामध्ये मानपान केला नाही मुलाला व्यवस्थित दागिने घातले नाही पतीने पगाराचे मागितलेले पैसे दिले नाहीत या ना त्या कारणावरून विवाहितेला त्रास सुरू होता, आश्विनी व निरंजन यांचा विवाह ऑक्टोबर 2021 मध्ये पुण्यामध्ये झाला होता. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी तुझे लग्न व्यवस्थित लावून दिले नाही पगाराचे पैसे तू देत नाहीत म्हणून त्रास देणे सुरू झाले, व 11 मार्च 2022 रोजी घराबाहेरही काढले, तू माहेरी जा परत येऊ नको आम्ही तुला नांदवणार नाही. असेही फिर्यादीत नमूद केले आहे, या घटनेचा अधिक तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
0 Comments