"गौडगाव येथे श्रमदानातून उभारला वनराई बंधारा..!"



 बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे कृषी विभाग, मल्टीपर्पज आदर्श इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आणि आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रमदानातून वनराईत बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.
     
 वनराई बंधारा बांधून पाण्याचासाठा करून पिकांना पाणी उपलब्ध करून देणे, गावातील शेतजमिनीची क्षेत्र, विहिर, बोअर मधील पाण्याचा स्रोत कमी होणार नाही, याची दक्षता घेऊन ओढ्यात वनराई बंधारा उभारण्यात आला.
      
गौडगाव ते भालगाव ओढा सध्या वाहत आहे, ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवल्यास भविष्यात पाण्याची अति टंचाई उद्भवणार नाही, त्यासाठी ओढ्यात वनराई बंधाऱ्याची निर्मिती केल्यामुळे पाणी टिकून राहील.
  वनराई बंधाऱ्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होत असल्याने शेतकऱ्यासह विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यासाठी पुढाकार घेण्याची आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
       
यावेळी कृषी सहाय्यक बी.व्ही. ढेकळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राहुल भड, गटनेते नागेश काजळे, शिक्षक संजय भड, नंदकुमार गरड अभिमन्यू पाटील, गोवर्धन भड, पोपट सोनवणे, दगडू पाटील आदी ग्रामस्थ आणि मल्टीपर्पज आर्दश न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments