बार्शी |
बार्शी येथील योग प्रचारक व सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत वायकर व त्यांच्या पत्नी सौ.साधना यांच्या हस्ते आजच्या अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. वायकर यांचा विविध सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज दिनांक १७ नोव्हेंबर अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण सूर्यकांत वायकर व साधना या दाम्पत्यांने केले.
विविध सामाजिक कार्यात असे नाव समजले जाते. मातृभूमी प्रतिष्ठानचे ते सदस्य आहेत. योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी 'अंबिका योग कुटीर' बार्शी मध्ये योग प्रचारासाठी जो वर्ग चालवला जातो त्यामध्येही त्याचा सक्रिय सहभाग असतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व मराठी साहित्य मंडळाचेही ते संचालक आहेत. सहकार भारती शाखा बार्शी ते संचालक आहेत.
सूर्यकांत वायकर यांचा आज ६४ वा वाढदिवस त्यानिमित्ताने सिल्व्हर ज्यूबिली मित्रपरिवार, भक्त सेवा संघ, अंबिका योग कुटीर शाखा बार्शी, मल्टीकोर क्रिएशन यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.
0 Comments