प्रांताधिकारी हेमंत निकम यांचे अधिकार तत्काळ काढा 'यांनी' केली निवेदनाद्वारे मागणी



बार्शी |

उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी न्यायिक अधिकारांचा गैरवापर केलेला आहे. त्यामुळे त्यांचे न्यायिक कामकाजाचे तसेच त्यावरील सुनावण्याचे अधिकार तत्काळ काढून घ्यावेत, अशी मागणी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महसूल विभागाचे अप्पर सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 निकम यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्राप्त असलेल्या अधिकाराचा गैरवापर केल्याची अनेक प्रकरणे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. ते कायदेशीर प्रक्रियेचा कोणताही अवलंब करीत नाहीत. त्यांची विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments