बार्शी पंचायत समितीमध्ये अँटी करप्शनची कारवाई ; २ हजाराची लाच घेताना शाखा अभियंता रंगेहाथ पकडले


बार्शी पंचायत समितीतील शाखा अभियंता दोन हजाराची लाज घेताना लाजल प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दुपारी 4 च्या दरम्यान झाली. आयुब शेख असे 2 हजाराची लाच घेताना अटक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी बार्शी तालुक्यातील नारेवाडी या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून काम केले होते त्या कामाचे बिल काढण्यासाठी शाखा अभियंता आयुब शेख यांनी 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 

दरम्यान मंगळवारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बार्शी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली ही आढावा बैठक संपते तोपर्यंत पंचायत समिती कार्यालय आवारात लाच घेताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाखा अभियंता शेख यांना पकडले अशी माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments