किरण लोहार नंतर आता भास्करराव बाबर कारवाईच्या कचाट्यात ; बाबर पळाले मुंबईला ; काय आहे प्रकरण


सोलापूर -  जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या लाच प्रकरणानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. आता सर्वांचे लक्ष्य असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे कारवाईच्या कचाट्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराने माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सचिवासमोर सुनावणीसाठी तातडीने बाबर यांना गुरुवारी मुंबईला रवाना व्हावे लागले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यासह इतर तालुक्यातील ही अनेक फायली बाबर यांनी जाणीवपूर्वक अडवून ठेवल्याने यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे असे अनेक प्रश्न बाबर यांच्याबाबत उपस्थित केले जात आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून बाबर यांना आलेल्या पत्रामध्ये विधानसभा लक्षवेधी सूचना क्रमांक 321 माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी 29 लाख पंचवीस हजार इतक्या रकमेचा केलेला भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरोधात जिल्ह्यातील एक आमदारांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याची सुनावणी शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता मंत्रालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्या सुनावणीसाठी बाबर गुरुवारी तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

       नेमके काय आहे प्रकरण

पंढरपूर तालुक्यातील एक शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापकात वाद सुरू होता त्या वादात संस्थेने मुख्याध्यापकाला सेवामुक्त केले होते या कारवाई विरोधात मुख्याध्यापकाने शाळा न्यायाधिकरणाकडे अपील केले त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेने केलेल्या कारवाई विरोधात सेवामुक्त मुख्याध्यापकाला शाळेत हजर करून घेण्याचे आदेश दिले मात्र या निकालाच्या विरोधात संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ही बाब न्यायप्रविष्ठ असताना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सेवामुक्त मुख्याध्यापकाला हाताशी धरून 29 लाख 55 हजाराचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत संस्थेने राज्याचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीवरून उकिरडे यांनी द्विसदस्यीय समितीकडून चौकशी लावली होती मात्र या समितीकडून कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.

Post a Comment

0 Comments