मंद्रुप येथील सितामाई तलावाजवळ ऊसतोड ट्रॅक्टर चालकाचा खुन ; आरोपींना अटक


सोलापूर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील सितामाई तलावाजवळ ऊसतोड ट्रॅक्टर चालक रमेश केशव मिसाळ राहणार खोकरमोहा ता. शिरूर कासार जि.बिड या 34 वर्षीय इसमाचा लाकडी काठीने मारून खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की,मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी बाळू भानुदास पवार हे सीतामाई तलाव मंद्रूप येथे 4 झोपड्या करून राहत असून दिनांक 31 ऑक्टोबर रोजी बाळू भानुदास पवार हे झोपडीत झोपले असताना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुकादमच्या झोपडीसमोर आरडाओरडा केल्याचा आवाज येत असल्याने फिर्यादी व त्याचा भाऊ  बालाजी दोघे जागे झाले.झोपडीच्या आतूनच ताडपत्री बाजूला सारून पाहिले असता मुकादम अभिमान साबळे व अशोक गिरी यांच्या झोपडीजवळची लाईट चालू होती. 

त्याठिकाणी मुकादम अभिमान साबळेचा मित्र रमेश मिसाळ याने मुकादमची बायको मनीषा हिला काहीतरी वाईट बोलल्याने त्यांच्यात वाद चालू होते.

अभिमान साबळे,अशोक गिरी,मलप्पा कांबळे,मनीषा साबळे,अंजना गिरी हे रमेश यास मारहाण करित होते.त्याचवेळी अभिमान साबळे याने जवळच पडलेल्या एका लाकडी काठीने पाठीवर,दोन्ही पायावर,तोंडावर मारहाण करत असतानाच मलप्पा कांबळे,मनीषा साबळे,अंजना गिरी यांनीही रमेश यास मारहाण करू लागले.या मारहाणीत रमेशला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पोत्यात भरून मुकादम अभिमान साबळे याच्या झोपडीत ठेवले होते. 

म्हणून आरोपी अभिमान बाजीराव साबळे,अशोक बगीनाथ  गिरी दोघे रा.मलकाचीवाडी,तालुका शिरूर कासार,जिल्हा बीड, मलप्पा मळसिद्ध कांबळे,राहणार सादेपूर,तालुका दक्षिण सोलापूर,मनीषा अभिमान साबळे,अंजना अशोक गिरी  दोघी राहणार मलकाचीवाडी,तालुका शिरूर कासार,जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली आहे. 

म्हणून या पाचही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिते प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी भेट दिली.

याचा अधिक तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार  करपे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments