"मामांच्या यशवंताचा निशाणा पक्का"! मिळवलं सुवर्ण पदक


करमाळा |

राजस्थान- जयपूर येथे सुरु असलेल्या ३१ व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावलकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून प्रतिनिधित्व करणारे निमगावचे सरपंच अन विठ्ठल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

यशवंत शिंदे यांनी सिंगल ट्रॅप इव्हेंट मध्ये ५० पैकी ४४ गुण मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 

महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या प्रमुख राज्यांसह देशातील विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्या स्पर्धेत यशवंतनं सुवर्ण वेध घेतल्याने त्याचा एक नवा पैलू सर्वांसमोर आलाय. त्यामुळं यशवंतच माढा-करमाळा सह सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments