उद्धव ठाकरेंचा 'हा' जवळचा माणूस शिंदेंच्या गळाला?मुंबई | 

ठाकरे - शिंदे गट वेगवेगळे झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली जागा घेतली आहे. बंड केलेले आमदार शिंदेंकडे तर अजूनही ठाकरेंकडे असलेले आमदार शिंदे गटाच्या जाळ्याभोवती फिरत आहेत अशा बातम्या वरचे वर येत आहेत. यातच नवी माहिती समोर आली असून, भाजप तर्फे ही माहिती उघडकीस
आणली आहे सांगितले जात आहे. ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असा एक व्यक्ती शिंदे गटात जाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेला कारण देखील तसंच आहे. ही व्यक्ती मुख्यमंत्री शिंदेंना जाऊन भेटून आली, त्यानंतर काल अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.


अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे सातत्याने अमित शाह यांच्यावर टीका करत असतांना नार्वेकर यांनी अमित शहांना ट्विटरवरून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून अनेक भाजप नेते नार्वेकर नाराज आहेत असं सांगत आहेत.

Post a Comment

0 Comments