वैराग जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार


वैराग |

वैराग उस्मानाबाद रोड जवळ गणपती मंदिराजवळ मोटार सायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली असून आप्पाराव गुंडीबा फाटके यांनी दिलेल्या माहितीनुसार वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


नंदू कुमार फाटके हे बँकेच्या कामासाठी मोटारसायकल (क्र. एम.एच१४सी एन ९७१०) वरून सोलापूर येथे बँकेच्या कामासाठी गेले होते. त्यानंतर उशीराने ते वैराग मार्गे रुई गावाकडे परतत असताना वैराग जवळील गणपती मंदिराजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिली. त्यांनी अपघात स्थळी जाऊन पाहिले असता चुलत भाऊ नंदकुमार फाटके हे जागेवरच मयत झाले होते. या घटनेचा अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments