मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या


सध्या बंगाली सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांच्या त्यातही अभिनेत्रींच्या मृत्यूच्या आणि आत्महत्यांच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशात आता या आत्महत्येचे लोन दक्षिणेपर्यंत पसरताना दिसत असून एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.

लोकप्रिय तमिळ अभिनेत्री दीपा हिने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. 29 वर्षीय अभिनेत्री दीपाने चेन्नईमधील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून प्रेमात असफल झाल्याने तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Post a Comment

0 Comments