सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश



सोलापूर/प्रतिनिधी:

बंद घरांची रेकी करून रात्रीच्यावेळी त्या घरांच्या खिडक्या तोडून लाखो रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून 40 तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांसह 15 लाख 61 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील तिघे अद्यापही फरार आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

माळशिरस पोलिस ठाण्यात बंद घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्याांनी घरफोडी करून 4 लाख 67 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येून रवि काळे व विजय काळे या दोघां सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे कबुल केले. या दोघांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर या आरोपीतांनी गेल्या तीन ते चार वर्षामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले.

Post a Comment

0 Comments