सेल्फीचं वेड जीवावर बेतलं... उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखलसोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे.रेल्वे गाडीवर चढून सेल्फी घेताना १७ वर्षीय तरुणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

मुकसि मुजाहीद जमादार वय वर्षे १७ (रा. सिध्देश्वर पेठ सोलापूर) असे विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे मालगाडी वर उभे राहून सेल्फी घेत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने मुकसि जमादारहा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.

Post a Comment

0 Comments