राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी दुपारच्या सञांत मुळेगांव तांङा नंबर २ येथे अचानक हातभट्टी दारु अङ्यावर धाङ टाकून एकूण १४८० लि.हातभट्टी दारुसाठी वापरण्यात येत असलेले रसायन जागीच नष्ट केले.या मध्ये एकूणच ३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने नष्ट केला.
या कारवाई दरम्यान मुळेगांव तांङा नंबर २ येथील उपस्थित जमावाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्ममचाऱ्यांवर हल्ला केला.या हल्ल्यात कर्मचारी प्रियंका कुटे हे जखमी झाले आहे.याप्ररकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी प्रियंका कुटे यांनी दिलेेल्या फिर्यादीवरून अनामिका धनु राठोङ,प्रधान रामा राठोङ,अदी प्रधान राठोङ,टोपू धनु चव्हाण,अमन प्रधान राठोङ (सर्व रा.भानुदास तांङा) यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात भा.द.वी कलम ३५३,३३३,२२५,१४७,१४३,१४९,५०४,५०६,१०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या हल्ल्यात जखमी कर्मचारी प्रियंका कुटे यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहे.या घटनेचा अधिक तपास सोलापूर तालुका पोलिस करत आहे.
0 Comments